नवी दिल्ली : जयललिला यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समजताच, त्यांच्या असंख्य चाहत्यांनी रात्रीपासूनच अपोलो रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केलीय. जयललितांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललितांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पाहिल्यानंतर कुड्डालोर जिल्ह्यातील अण्णाद्रमुकच्या सदस्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये.


जयललितांच्या तब्येतीबाबतची बातमी समजल्यानंतर मोठ्या संख्येने चाहते रुग्णालयाबाहेर जमल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 


खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नई वाहतूक पोलिसांनी अपोलो रुग्णालयाच्या दिशेने जाणारे रस्ते बंद केले आहेत. तसचं रुग्णालच्या चारी बाजूंना बॅरीकेटस लावण्यात आले आहेत. शीघ्र कृती दलाच्या 9 तुकड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच निमलष्करी दलालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.