मुंबई : अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या 'एअर इंडिया'च्या एका विमानाचा अपघात थोडक्यासाठी टळलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातग्रस्त 'एअर इंडिया'च्या एआय-६१४ या विमानात १२८ प्रवासी प्रवास करत होते. 


मंगळवारी सकाळी अहमदाबाहून निघालेल्या या विमानाचा टायर मुंबई एअरपोर्टवर उतरताना फाटला. सुदैवानं, या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. 
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादहून निघालेल्या विमानानं ९ वाजून ४ मिनिटांनी मुंबईला लँन्डिंग केलं.... पण, यावेळी त्याचा टायर फाटला... त्यामुळे काही वेळ विमानाचा तोल गेला... परंतु, पायलटच्या प्रसंगावधानामुळे पुढचा अनर्थ टळला. 


मुंबईनंतर हे विमान रायपूरकडे रवाना होणार होतं. अपघातानंतर विमानकंपनीनं प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची सोय केली.