एअर इंडियाचा पायलट दारू पिऊन `हवेत`
एअर इंडियाच्या एका पायलटनं दारू पिऊन विमान चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कालिकत : एअर इंडियाच्या एका पायलटनं दारू पिऊन विमान चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानाच्या लॅडिंगनंतर या पायलटची टेस्ट घेण्यात आली. बुधवारी शारजाहवरून कालिकतला आलेल्या विमानातल्या पायलटची टेस्ट झाल्यानंतर हा खुलासा झाला आहे.
याआधीही हाच पायलट नशेमध्ये असल्याचं समोर आलं होतं. त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीडीसीएच्या नियमांनुसार असामान्य परिस्थितीमध्ये विमान चालवताना पायलटला तिसऱ्यांदा पकडण्यात आलं तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येतं.