मुंबई : 'बोईंग 747' म्हणजे खऱ्या अर्थाने जंबो जेट... एअर इंडियाने आता बोईंग 747 डोमेस्टीक रूट्सवरही फ्लाय करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल 426 प्रवाशांना वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. 2017 च्या सुरूवातीपासून एअर इंडियाच्या डोमेस्टीक रूट्सवर बोईंग 747 ने प्रवास करणं शक्य होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडियाच्या ताफ्य़ातल्या बोईंग 747 ची शान सर्वांनाच माहिती आहे. आता ही शान तुम्हाला डोमेस्टीक म्हणजे देशांतर्गत मार्गांवरही अनुभवता येईल. बोईंगच्या या अतिभव्य विमानाची एका वेळी 426 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. यात 358 इकॉनॉमी क्लास, 26 एक्झिक्युटीव्ह क्लास तर 12 फर्स्ट क्लासच्या सीट्स आहेत. एअर इंडियाच्या ताफ्यातील 2 विमानं डोमेस्टीक रूट्सवर असतील. सध्या मुंबई दिल्ली मार्गावर ही विमाने उड्डाणं करतील. सध्या कोणत्याही डोमेस्टीक फ्लाईटवर फर्स्ट क्लास नाही, पण एअर इंडिया या विमानांमुळे फर्स्ट क्लासचाही पर्याय मिळणार आहे. 3 कोर्स फाईव्ह स्टार मिल डोमेस्टिक फ्लाईटवर मिळू शकेल. तर या प्रवासात 25 किलोंपर्यंत लगेज नेता येणार आहे.


बोईंग 747 ची वैशिष्ट्य


- धूसर वातावरणात टेक ऑफ आणि लॅन्डिंग


- 1000 किलोमीटर प्रती तास इतका प्रचंड वेग


- 4 इंजिनांची स्टॅबिलिटी


याच्या प्रचंड वेगामुळे मुंबई दिल्ली अंतर केवळ 1 तास 33 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. सध्या एअर इंडिया केवळ 2 विमानं डोमेस्टीक रूटवर त्यातही एकाच मार्गावर उडवणार आहे. मात्र यामुळे इतर एअर लाईन ऑपरेटर्सकडूनही अशी सेवा सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नव्या वर्षात तयार व्हा... मुंबई दिल्ली प्रवास बोईंग 747 ने करण्यासाठी...