नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी प्रवासाची बंदी घातल्याने लोकसभेत जोरदार हंगामा झाला. शिवसेनेचे गटनेते अनंत  गिते हे विमान बंदी प्रश्नावर अधिक आक्रमक झालेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते चक्क धावून गेल्याने लोकसभेत एकच गोंधळ झाला. शिवसेनेसे पंगा मत लेना असे म्हणत मंत्री अनंत गिंते यांनी भाजप मंत्र्यांना दमबाजी भरली, जुतों से मारूंगा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली. तसेच गायवाड यांच्याविरोधात गैरवर्तन केले. मात्र, गायवाड यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे. सर्व विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी घातली. त्यामुळे लोकसभेत हा प्रश्न आज उपस्थित करण्यात आला. त्यावेळी शिवसेना खासदार अधिक आक्रमक झालेत. यावेळी  केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू  यांना घेरले. त्यावेळी एकच गोंधळ झाला. 


दरम्यान, कायदा आपलं काम करतोय, सुरक्षेशी कुठलीही तडजोड शक्य नाही, असं मोघम उत्तम देऊन रवींद्र गायकवाड मारहाण प्रकरणात तटस्थ भूमिका घेणारे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते चक्क धावून गेल्यानं लोकसभेत एकच गहजब झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि मंत्री स्मृती इराणी यानी मंत्री अनंत गिते यांना अडविले. अनंत गिते यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. मोदी सरकारच्या काळात कुठल्याही चौकशीविना एका खासदाराच्या विमान प्रवासावर बंदी घातली जाते, हे लज्जास्पद असल्याची चपराक त्यांनी लगावली.


त्यानंतर खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी उठवली नाही, तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा इशाराही शिवसेना खासदारांनी गोंधळादरम्यान दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसून येत आल्याने सावध भूमिका घेण्यात येत आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज लोकसभेत निवेदन केलं. जे झालं ते अधिकाऱ्याच्या गैरवर्तणुकीमुळे, मुजोरीमुळे झालं, असा दावा करत गायकवाड यांनी न्यायाची मागणी केली. विमान प्रवासावरील बंदी उठवावी आणि कलम ३०८ अन्वये दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी सभागृहात केली.


मंत्री अशोक गजपती राजू काहीतरी ठोस उत्तर देतील, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. परंतु, कायदा आपलं काम करतोय, एवढंच सांगून त्यांनी विषय संपवला. त्यामुळे शिवसेना खासदार खवळले आणि गोंधळ सुरू झाला. सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकूब केलं. त्यानंतर, शिवसेना खासदारांनी गजपती राजू यांना घेराव घातला. 


दरम्यान, या सगळ्या गोंधळानंतर सभापतींनी राजनाथ सिंह, अशोक गजपती राजू यांच्यासोबत शिवसेना खासदारांची बैठक घेतली. त्यात, सर्वपक्षीय बैठकीत या विषयावर तोडगा काढण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे.


काय आहे घटनाक्रम


- शिवसेनेसे पंगा मत लेना, जुतों से मारूंगा 
- अनंत गीते यांनी गजपती राजू यांना दम भरला
- शिवसेना खासदारांनी गजपती राजू यांना घेरले
- रविंद्र गायकवाड वर जाणून बुजून अन्याय का करता ?
- प्रवास बंदी का केली ?
- गीते यांनी गजपती राजू यांना केला सवाल
- राजनाथ सिंग यांची मध्यस्थी
- रवी गायकवाड प्रकरणी लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा झाली आहे
- लवकरच मार्ग काढला जाणार आहे
- राजनाथ सिंग यांनी लोकसभेत केले वक्तव्य