एअरटेलने महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती रजेचा कालावधी वाढवला
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरुन २२ आठवडे इतका केलाय.
नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरुन २२ आठवडे इतका केलाय.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तसेच कामकाज करणाऱ्या मातांना त्यांच्या सुविधेनुसार काम करण्याची सोय केली जाणार आहे. कंपनीत्या गुडगाव येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डे केयरची सुविधाही आहे.
याआधी एअरटेलमध्ये महिलांना प्रसूती रजा १२ आठवड्यांची दिली जात असे. मात्र आता कंपनीने हा कालावधी वाढवलाय. यामुळे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला वेळा मातेला देता येईल