अजित डोवाल यांनी घेतली मोदींची भेट, परिस्थितीची दिली माहिती
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन एलओसीवरील परिस्थितीचा माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांना सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी दिला. सूत्रांच्या माहितीनुसार डोवाल यांनी म्हटलं की, सीमेवर पाकिस्तानी सेनेकडून हालचाली वाढल्या आहे.
नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन एलओसीवरील परिस्थितीचा माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांना सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी दिला. सूत्रांच्या माहितीनुसार डोवाल यांनी म्हटलं की, सीमेवर पाकिस्तानी सेनेकडून हालचाली वाढल्या आहे.
पाकिस्तानकडून पुंछमध्ये नियंत्रण रेषेवरील शाहपूर सेक्टरवर शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन केलं. पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल ऑपरेशनच्या तीन दिवसानंतर जम्मू-कश्मीरातील बारामूलामध्ये लष्कराच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला. उशिरा रात्री लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला. दहशतवाद्यांनी सुरुवातीला ग्रेनेड हल्ला केला आणि मग गोळीबार सुरु केला या हल्ल्यात १ जवान शहीद झाला तर २ जवान जखमी झाले आहेत.