नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी काँग्रेसविरोधात बंडाचा झेंडा उगारला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014च्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये फिक्सिंग केल्याचा आरोप करत काँग्रेसनं अजित जोगींचा मुलगा अमितला पक्षातून निलंबित केलं होतं. यावेळी अजित जोगींवर कारवाई करण्याबाबतही विचार करण्यात आला होता, पण तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. 


काँग्रेसवर टीका करणारे अजित जोगी हे सहा जूनला मरवाहीमध्ये नव्या पक्षाची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 15 हजारांपेक्षा जास्त शुभचिंतकांनी मला फोन केला आहे, माझ्यावर त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यासाठी दबाव आहे, असं अजित जोगी म्हणाले आहेत.