धक्कादायक : अखिलेश यादव पराभवाच्या छायेत...
सध्या हाती आलेल्या कलानुसार, उत्तरप्रदेशमध्ये भाजपचं कमळ फुललेलं दिसतंय. धक्कादायक म्हणजे, मुबारकपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री अखिलेश यादव पिछाडीवर गेलेत. तर बसपाचे शाह आलम आघाडीवर आलेले दिसत आहेत.
लखनऊ : सध्या हाती आलेल्या कलानुसार, उत्तरप्रदेशमध्ये भाजपचं कमळ फुललेलं दिसतंय. धक्कादायक म्हणजे, मुबारकपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नावाशी साधर्म्य असलेले सपाचे उमेदवार अखिलेश यादव पिछाडीवर गेलेत... तर बसपाचे शाह आलम आघाडीवर आलेले दिसत आहेत.
उत्तरप्रदेशातील यादव घराण्यातील 'अंतर्गत यादवी' या सपाच्या पिछाडीचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं जातंय. शिवाय, राहुल गांधी आणि अखिलेश कुमार यादव यांची युती काही मतदारांना फारशी रुचलेली दिसत नाही.
मुस्लिम मतदार काँग्रेसपासून कधीच दूर गेलाय... त्यामुळे राहुल गांधींना सोबत घेतल्यानं अखिलेश कुमार यादव यांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला, अशी टिप्पणी भाजप नेते माधव भंडारी यांनी केलीय.
सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशात भाजप 311, सपा-काँग्रेस 63, बहुजन समाज पक्ष 22 तर इतर 7 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय.