अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर
![अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/01/20/213739-akhilesh-yadav-7.jpg?itok=6fHbP1qr)
काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली, समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे.
लखनऊ : काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली, समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे.
191 जणांच्या या यादीत अखिलेशचे कट्टर विरोधक आणि वादाचं मूळ ठरलेले शिवपाल यादव यांना, जसवंतनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. तर सपा सोडून भाजपमध्ये गेलेल्या बेनीप्रसाद वर्मांच्या जागी अरविंदसिंह गोप यांना तिकीट देण्यात आले आहे.
प्रतिष्ठेच्या कानपूर केंटचे आमदार अतिक अहमद यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी हसन रुमी यांना तिकीट देण्यात आलंय. तर सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांचे चिरंजीव नितीन अग्रवाल यांची पहिल्या यादीत हरदोयी मतदारसंघात वर्णी लागलीय. तर सपाचे ज्येष्ठ मंत्री आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांनाही रामपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.