मुंबई: भारतातून पोलिओ कायमचा संपवण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. आणि आता अमिताभ बच्चन आरोग्य खात्याच्या कंडोम आणि गर्भनिरोधकांच्या जाहिरातींमध्येही दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातल्या कंडोमच्या मार्केटमध्ये खासगी कंपन्यांनी उडी घेतली, पण यामध्ये सरकारच्या माला डी आणि निरोध हे ब्रँड गायब झाले. या ब्रँडचं आता मार्केटिंग करून जनजागृती करायचा निर्णय आरोग्य खात्यानं घेतला आहे. इतकच नाही तर फ्लेवर्ड कंडोमची निर्मितीही करण्यात आली आहे. 


आता या जाहिरातींमध्ये थोड्याच दिवसांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत.