पुणे : काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंजिनिअर असलेले अनिल बोकील हे अर्थक्रांती या संस्थेचे सदस्य आहेत. 2014मध्ये लोकसभा निवडणुकांच्या आधी अनिल बोकील यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी बोकील यांना मोदींच्या भेटीसाठी फक्त 9 मिनीटांचा वेळ मिळाला होता, पण जेव्हा भ्रष्टाचार आणि खोट्या नोटांबद्दल बोकील जेव्हा बोलायला लागले तेव्हा मोदींनी दोन तासांपर्यंत हा प्रस्ताव ऐकला.


मोदींबरोबरच बोकील यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचीही भेट घेतली होती. राहुल गांधींनी मात्र या प्रस्तावावर बोलण्यासाठी बोकील यांना फक्त 15 सेकंदांचा वेळ दिला.


काय आहे अर्थक्रांती संस्था ?


अर्थक्रांती संस्था ही चार्टर्ड अकाऊंटंट आणि इंजिनिअर्सचा ग्रुप असलेली अर्थशास्त्राबाबत सल्ला देणारी एक संस्था आहे. अर्थक्रांती संस्थेनं मोदींना काळा पैसा, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि दहशतवाद्यांना होणारं फंडिंग रोखण्यासाठी हा प्रस्ताव दिला होता.