नवी दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद एकाचवेळी नांदू शकतात. पण देश तोडण्याची भाषा खपवून घेतलं जाणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या दिल्लीतल्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. समारोपाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अरूण जेटलींनी विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 


त्यावेळी बोलताना उत्तराखंडातल्या राजकीय परिस्थितीवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. त्याचप्रमाणे इशरत प्रकरणी अडचणीत सापडलेल्या काँग्रेसच्या सरकारवरही ताशेरे ओढले. 


पाच राज्यात येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलंय.