काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला
पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.
मुंबई : पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.
ममतांना दोन तृतीयांश बहुमत
काँग्रेसला पुन्हा एकदा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आसाम आणि केरळ या दोन्ही राज्यांतील सत्ता काँग्रेसने गमावली आहे. तर दुसरीकडे एकाच पक्षाला दुसऱ्यांदा निवडून न देण्याची तामिळनाडूतील परंपराही मोडीत निघाली आहे. बंगालवासियांचा ममतांवर पुन्हा विश्वास पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने निर्भेळ यश मिळाले. ममता बॅनर्जी यांना जवळपास दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे.
भाजपला मतदारांनी नाकारले
२०११ मधील निवडणुकीपेक्षा तृणमूल काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेसच्या साथीने पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे डाव्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, जनतेने त्यांना थेटपणे नाकारले असल्याचे जागांवरून दिसते. प्रचारात ममता बॅनर्जींवर जोरदार टीका करणाऱ्या भाजपलाही मतदारांनी नाकारले आहे. भाजप आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
जयललितांवर पुन्हा विश्वास
द्रमुकच्या पर्यायाला नापसंती तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुक आघाडी यांच्यात झालेल्या लढतीत पुन्हा एकदा मतदारांनी जयललिता यांच्याच पारड्यात आपला विश्वास टाकला आहे. १९८४ पासून चालत आलेली ही परंपरा यावेळी पहिल्यांदाच मोडली असून, जयललिताच राज्यात सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकने काँग्रेसशी आघाडी केली होती. पण निवडणुकीत त्याचा किंचितही फायदा द्रमुकला झालेला दिसत नाही.
केरळात मुख्यमंत्री ओमन चंडींना नाकारले
केरळमध्ये काँग्रेस आघाडीची पिछाडी केरळमध्ये मुख्यमंत्री ओमन चंडी यांना मतदारांनी नाकारले असून, डाव्या आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. डाव्या आघाडीने केरळमध्ये मोठी मुसंडी मारल्याचेही दिसून आले आहे. आसाममध्ये भाजपची मुसंडी आसाम तरूण गोगोई यांच्या हातून सत्ता गेली असून, तिथे भाजपच्या नेतृत्त्वाखाली सर्बानंद सोनोवाल यांचे सरकार येणार हे नक्की झाले आहे.
पक्षीय बलाबल :
आसाम १२६/१२६
भाजप - ८६
काँग्रेस - २६
यूडीएफ - १३
केरळ - १४०/१४०
कम्युनिष्ट डावे - ८३
यूडीएफ - ४७
इतर - ९
भाजप - १
पुडुचेरी ३०/३०
डीएमके - १७
एआयएनआरसी - ८
काँग्रेस - ३
इतर - १
पश्चिम बंगाल २९४/२९४
तृणमूल काँग्रेस - २११
कम्युनिष्ठ डावे - ६७
भाजप - ६
इतर - १
तामिळनाडू २३२/२३४
एआयएडीएमके - १३२
डीएमके - ९६
डीएमडीके - ०