रेल्वे स्टेशनवर एटीएमची सुविधा?
रेल्वेच्या महसूलात वाढ करण्याच्या हेतूनं आता स्टेशनवरची जागा एटीएम मशीनसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय. या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.
नवी दिल्ली : रेल्वेच्या महसूलात वाढ करण्याच्या हेतूनं आता स्टेशनवरची जागा एटीएम मशीनसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय. या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवरच्या जागांचे लिलाव करण्यात येतील. त्यामुळे व्यवहार पारर्दशक असेल. लिलावानंतर मिळणाऱ्या जागेवर कंत्राटदाराला 10 वर्ष एटीएम मशीन लावता येईल.
सध्या रेल्वेच्या प्रवासी भाड्यातून महसूलात फक्त पाच टक्के वाढ होते. त्यामुळे अतिरिक्त महसूलासाठी काही नवीन नवीन मार्ग शोधण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न आहे. त्यातूनच हा मार्ग शोधण्यात आलाय.