एटीएममधून खोट्या नोटा किंवा स्टॅपलर लागलेल्या नोटा निघाल्यास काय कराल?
एटीएममधून पैसे काढताना नोटांच्या बाबतीत नेहमीच गोंधळ होतो. पैसे काढून खुप वेळ झाल्यावर तुम्हाला कळतं की नोट खोटी आहे किंवा ती नोट बाजारात चालणार नाही.
मुंबई: एटीएममधून पैसे काढताना नोटांच्या बाबतीत नेहमीच गोंधळ होतो. पैसे काढून खुप वेळ झाल्यावर तुम्हाला कळतं की नोट खोटी आहे किंवा ती नोट बाजारात चालणार नाही.
खोट्या नोटा किंवा स्टॅपलर लागलेल्या नोटा एटीएममधून आल्यास लगेच त्यावर काही तोडगा काढणं गरजेचं आहे. या नोटांमुळे मोठ नुकसान होऊ शकतं.
देशातील अनेक ठिकाणी अश्या घटना सर्रास घडत असतात, यावर उपाय म्हणून किंवा तुमचं नुकसान होवू नये यासाठी काही पाऊलं उचलनं आवश्यक आहे.
एटीएममधून खोट्या नोटा किंवा स्टॅपलर लागलेल्या नोटा आल्या असतील तर हे 4 उपाय करा
1 एटीएमच्या गार्डला या गोष्टींची तक्रार करा
2 ज्या बँकेचं एटीएम असेल त्या बँकेत जावून या नोटा बदलून घ्या
3. रिझर्व बँकेला मेल करा
4. याबाबत तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकता