विजय माल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात
विशेष न्यायालयाने फरारी आरोपी विजय माल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिल्यानंतर, सक्तवसूली संचालनालयाने माल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात केली.
नवी दिल्ली : विशेष न्यायालयाने फरारी आरोपी विजय माल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिल्यानंतर, सक्तवसूली संचालनालयाने माल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात केली.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ईडीने कारवाई करत माल्ल्याची सोळाशे वीस कोटींची जंगम मालमत्ता जप्त केलीय. यात माल्ल्याच्या नावावर असलेल्या शेअर्सचाही समावेश आहे.
यापूर्वी केलेली जप्तीची कारवाई लक्षात घेता आतापर्यंत माल्ल्याला एकूण 8 हजार कोटीच्या संपत्तीवर पाणी सोडावं लागणार आहे. दरम्यान, शुक्रवारी विजय माल्ल्यांसह काही जणांना करचुकवेगिरी प्रकरणी विशेष न्यायालयाने फरार घोषीत केलं होतं.