मुंबई : हल्ली अनेक इव्हेंट्सना फिल्मी टच दिलेला पाहायला मिळतोय. मात्र जेवणातही जर असाच एखादा फिल्मी टच पाहायला मिळाला तर...कशी वाटतेय कल्पना... ही कल्पना एका रेस्टॉरंटमध्ये सत्यात उतरलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादच्या एका रेस्टॉरंटमध्ये मध्ये चक्क बाहुबली थाळी या नावाचा मेन्यू कार्डमध्ये सामाविष्ट करण्यात आलाय. बाहुबली या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दाखवली होती.


या सिनेमाचे फॅन असलेले राजेश पटेल आणि मनीष पटेल यांनी तर या नावाची थाळीच बनवली आणि मेन्यू कार्डमध्ये समावेश केला. होटल राजवाडूमध्ये तुम्हाला ही थाळी मिळू शकते. 


या थाळीत सलाद पासून चटण्या, लोणचं, पापड, रोटी, भाजी, डाळ, मिठाई यासोबत अनेक पदार्थ असतात.