तर त्यांची मुंडकी छाटली असती - बाबा रामदेव
योगगुरू बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतात कायदा अस्तित्वात नसता तर `भारत माता की जय` न म्हणणाऱ्यांची मुंडकी उडविली असती, असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.
रोहतक : योगगुरू बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतात कायदा अस्तित्वात नसता तर 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्यांची मुंडकी उडविली असती, असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.
रामदेवबाबा म्हणाले की, काही लोक टोपी घालून उभे राहतात आणि म्हणणात आमचे मुंडके कापा, पण आम्ही 'भारत माता की जय' असे म्हणणार नाही. आमचे हात कायद्याने बांधले आहेत, कायदे नसते तर लाखोंची मुंडकी धडापासून वेगळी केली असती.
हरियाणामध्ये रविवारी एका कार्यक्रमात बोलताना रामदेवबाबांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत माता की जय म्हणण्यास नकार दिला होता. तेव्हापासून देशात या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. आता रामदेवबाबांनी हे वक्तव्य केल्याने आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.