बलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट
बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.
नवी दिल्ली : बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे. त्यामुळे तिथली स्थानिक जनता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. या स्वातंत्र्यांच्या मागणीला इतर देशांचाही पाठिंबा मिळावा यासाठी एक चळवळ सुरू झाली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून बलुचिस्तानच्या नेत्या नियला काद्री बलूच या भारतातील राजकीय नेत्यांना भेटून चळवळीला पाठबळ उभे करत आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांनी आज भेट घेतली. रामदास आठवले यांनी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिलं आहे. नियला काद्री यांनी यावेळी पाकिस्तानच्या अत्याचाराचा पाढा रामदास आठवलेंपुढे वाचला.