नवी दिल्ली :  लवकरच देशभरात शाळांच्या पाचशे मीटरच्या परिसरात पिझ्झा, बर्गर सारखे जंक फुड विकण्यावर बंदी येण्याची शक्यताय.  FSSAI ही केंद्रीय संस्था सध्या अशा जंक फुड वर्गातल्या पदार्थांची यादी तयार करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि मेद यांचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा या यादीत समावेश करण्यात येणार आहे.  यादी तयार झाली की तातडीनं ही बंदी लागू करण्यात येईल.  लहान वयात मधुमेह आणि लठ्ठपणा या आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्याची तयारी सुरू झालीय


 एका सर्वेक्षणानुसार जंक फूडच्या सेवनानं 20 टक्के विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलंय.  लहान वयात आलेल्या लठ्ठपणामुळे मोठेपणी ब्लडप्रेशर,  मधमेह, हृदयविकार यासारखे जीवघेण्या रोगांचं प्रमाण वाढत चाललंय. 


नुकत्याच जारी झालेल्या आकेडवारीनुसार 2000 ते 2013 या तेरा वर्षात लठ्ठपणामुळे झालेल्या मधुमेहाचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. त्यामुळे याविषयी सरकारी स्तरावर पावलं उचलण्याची गरज भासू लागली आहे.