...असे `जोक्स` बलात्कारांना प्रोत्साहन देतात?
सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक `जोक` चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...
बंगळुरू : सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक 'जोक' चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...
पण, या जोकवर हसून नाही तर त्यावर टीका करून त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवताना नेटिझन्स दिसतायत.
हा जोक असूच शकत नाही किंवा अशाच 'टुक्कार' जोक्समुळे बलात्काराच्या घटनांना प्रोत्साहन मिळतं असं अनेक नेटिझन्सचं म्हणणं आहे.
पाहुयात काय आहे हा जोक...
फेसबुक युझर अनौष्का कपूर हिनं एक फोटो शेअर केलाय. बंगळुरूमधल्या 'लेमन ट्री' नावाच्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाथरुममध्ये हा 'जोक' तिला दिसला... आणि तिला तो शेअर करून त्यावर आपली तीव्र प्रतिक्रियाही नोंदवावीशी वाटली...
आपल्या पार्टनरसोबत असताना महिलेनं डोकेदुखीचं कारण देऊन शरीरसंबंध नाकारणं... हे पटणं पुरुषाला जड जातंय... असा काहीसा या 'सोकॉल्ड जोक' जोकचा संदर्भ... परंतु, अशा प्रकारच्या वैवाहिक बलात्कारालादेखील प्रोत्साहन दिलं जातंय, असं नेटिझन्सचं म्हणणं आहे.