भरतपूर : राजस्थानमध्ये आलेल्या चक्रीवादळात एका मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. या अपघातात २५ जण ठार झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमध्ये भरतपूर जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. बुधवारी रात्री लग्नासाठी भारतपूरच्या मंगल कार्यालयात लोक जमा झाले होते. यावेळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ८० ते ९० फूट लांब आणि १२ फूट उंच भिंत कोसळली आणि हा अपघात घडला. वादळापासून वाचण्यासाठी उपस्थितांनी एका शेडचा आसरा घेतला होता. शेड आणि त्यालगतची भिंत कोसळल्यानं लोक त्याखाली दबले गेले. ही


मृतांमध्ये ७ महिला आणि ४ लहानग्यांचा समावेश आहे. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली काही माणसंही अडकली होती. या अपघातात २६ जण जखमी झाले असून, त्यापैंकी १६ जणांची प्रकृती गंभीर आहे.


काही दिवसांपूर्वीच हे मंगल कार्यालय बांधण्यात आले होते. विशेष म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे दोघेही सुरक्षित बचावले.