१०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड
पोलिसांनी मंगळवारी येथील एका बड्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणी एका कपलसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की, या जोडप्याने ५ हजारांहून जास्त मुलींना वेश्या व्यवसायाला लावले असण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : पोलिसांनी मंगळवारी येथील एका बड्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणी एका कपलसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की, या जोडप्याने ५ हजारांहून जास्त मुलींना वेश्या व्यवसायाला लावले असण्याची शक्यता आहे.
क्राइम ब्रँचने जेव्हा जीबी रोड परीसरात रेड टाकली तेव्हा तळघरात 250 मुली अक्षरशः कपाटात बंद होत्या. आरोपींविरोधात मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुली सर्व परराज्यातील...
- पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक आणि आसाम येथून मुली आणतात.
- क्राइम ब्रँचचे जॉइंट कमिश्नर रविंद्र यादव यांनी सांगितले, की पोलिसांनी दोन रेड टाकल्या, त्यात ८ आरोपी पकडण्यात आले. त्यातील ३ महिला आहेत.
- ही गँग पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, आसाम, आंध्रप्रदेश, झारखंड आणि नेपाळमधून मुलींना आणून त्यांना देहव्यापाराच्या दलदलीत ढकलतात.
- या व्यवसायात ५० ते ६० हजार रुपयांमध्ये मुलींची खरेदी करुन जीबी रोडला त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत विकले जाते.
- या गँगचे प्रमुख सायरा बेगम आणि आफाक हुसैन यांची या गोरख धंद्यातील कमाई 100 कोटींपेक्षा जास्त आहे.
- जीबी रोडसह दिल्लीतील अनेक अज्ञात स्थळी या मुलींना चेंबर, तळघरे आणि कपाटांमध्ये बंदीस्त ठेवले जाते.
ऑर्गनाइज आहे संपूर्ण रॅकेट
- पोलिसांचे म्हणणे आहे की हे रॅकेट अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. अतिशय ऑर्गनाइज पद्धतीने त्यांचे काम चालते.
- अटक करण्यात आलेल्या कपलचे दिल्ली आणि बंगळुरुमध्ये कित्येक फार्महाऊस आहेत. त्यांच्याकडे लक्झरी कारचा ताफा आहे, दिल्लीत काही दुकाने आहेत. सायरा बेगम आणि आफाक हुसैन यांच्या बँक अकाऊंटमध्ये कोट्यवधी रुपये आहे.
- आफाकचा मसलमॅन सरफराज उर्फ बल्ली फरार आहे. जीबी रोडवर त्याची दहशत आहे.
कारपेंटर ते करोडपती
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा प्रमुख आफाक हा सुरुवातीला एक साधा कारपेंटर होता. त्याचे जीबी रोडवर येणे-जाणे राहात होते. त्यातच त्याची भेट सायरासोबत झाली. दोघांनी लग्न केले.
- 1990 नंतर सायरा आणि आफाकने सेक्स रॅकेटचा गोरखधंदा सुरु केला. पोलिसांनी त्यांच्या 6 ठिकाण्यांवर छापे टाकले. 40 खोल्यांमध्ये 250 मुलींना बंद करुन ठेवण्यात आले होते.
- या खोल्याही एका कपाटासारख्या होत्या. येथे श्वास घेणेही दुरापास्त होते, अशा रुममध्ये मुलांना ठेवलेले होते.
- या मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी वृद्ध महिलेची नेमणूक केलेली असायची.
- त्यासोबतच त्याने कमाईचा हिशोब ठेवण्यासाठी एक मॅनेजरही ठेवलेला होता. एका रजिस्टरमध्ये रोजच्या कमाईची नोंद केली जात होती.
एका दिवसाची कमाई 10 लाख रुपये
- पोलिसांचे म्हणणे आहे की या कपलने एक मोठे सिंडीकेट रॅकेट उभे केले होते. त्याच्या माध्यमातून त्यांची एका दिवसाची कमाई 10 लाख रुपयांपर्यंत होत होती.
- दोघांनी त्यांचे एजंट्स नेमलेले होते. ते एजंट्स मुलींना नोकरीचे आमिष दाखवून घेऊन यायचे, आणि कित्येक दिवस त्यांना कैद ठेवले जात होते.
- येथे मुलींना टॉर्चर केले जात होते. जेव्हा त्यांना आता आपण बाहेर पडू शकत नाही, त्यांचे मनोधौर्य संपल्यानंतर त्यांना जीबी रोडवर देहव्यापाराच्या धंद्यात उतरवले जात होते.
यापूर्वीची अटक
- या दोघांवर याआधीही असे गुन्हे दाखल झाले असून अटक देखील झालेली आहे, मात्र तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा देहव्यापाराचा धंदा पुुन्हा सुरु होतो.