मुंबई : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा रविवारचा मुंबईतला प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडूनच त्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई भाजपनं स्वामींचा कार्यक्रम केसी कॉलेजमध्ये आयोजित केला होता. मात्र स्वामी करत असलेल्या वारंवारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे, भाजप आयती अडचणीत सापडत आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून स्वामींचा मुंबईतला नियोजित कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे. 


आणीबाणीवर मुंबईत स्वामी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यामागचं कारण भाजपकडून देण्यात आलेलं नाही.