नवी दिल्ली : पाच राज्यातल्या विधानसभा निवडणूकीप्रमाणेच दिल्ली महापालिकेतही भाजपच्या कमळनं आम आदमी पक्षाच्या केजरीवालांना झाडून साफ करून टाकलंय. दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं सध्याचं चित्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतमोजणी सुरू असलेल्या सर्वच्या सर्व जागांचे कल हाती आलेत. त्यापैकी 182 ठिकाणी भाजपला आघाडी असून काँग्रेस 38 आपला 39 जागांवर आघाडी मिळालीय. त्यामुळे दिल्ली महापालिकेत भाजपच पुन्हा एकदा सत्तेवर येणार हे आता स्पष्ट झालंय.  


आम आदमी पक्षानं या पराभवचं खापर मतदान यंत्रांवर फोडलं असून मतदान यंत्रात भाजपच्या विजयासाठी फेरफार करण्यात आलाचा जुनाच दावा पुन्हा एकदा करण्यात आला आहे.  दरम्यान भाजपचे दिल्ली प्रभारी शाम जाजू यांनी विजयाचं श्रेय कार्यकर्ते आणि जनतेला दिलंय. मतदान यंत्रांवर आम आदमी पक्षानं प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे पराभवाचं सोयीस्कर समर्थन असल्याचा टोलाही त्यांनी हाणला आहे.