नवी दिल्ली : राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक पार पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या 403 जागांसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आलीय. या यादीवर केंद्रीय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. याशिवाय उत्तराखंडमधील भाजप उमेदवारांची पहिली यादीसुद्धा जाहीर होणार असल्याचं बोललं जातंय. उत्तर प्रदेशच्या 403 जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात म्हणजे 15 फेब्रुवारीला निवडणूक होतेय.