मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या प्रवक्त्या सोनाली सिंह फोगाट आता अभिनेत्री बनल्या आहे. लवकरच त्या 'अम्मा' या टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. याशोमध्ये त्या हैदर (नवाब शाह) च्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली सिंह देशातील अनेक भागात ST जातीच्या लीडर आहेत. सोनाली हरियाणामधून आहेत. मागील ८ वर्षापासून त्या बीजेपीच्या अॅक्टिविस्ट म्हणून काम करत आहेत.


सोनालीने मध्यप्रदेश आणि झारखंडमधील ट्राइबल लोकांसाठी काम केलं आहे. अॅक्टिविस्टसह त्या अभिनेत्री ही बणण्याचंही स्वप्न पाहत होत्या. त्यामुळे त्या अम्मा शोसाठी ऑडिशन द्यायला गेल्या आणि त्यांना रोल मिळाला.


या शोसाठी महिन्यातून ७ ते ८ दिवस त्यांना काम करायला लागणार आहे. १० वर्षापूर्वी सोनाली हरियाणामध्ये दूरदर्शनवर अँकर म्हणूनही काम केलं आहे.