नवी दिल्ली : शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत शिवसेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेनेची २५ वर्ष सडल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता, त्याला नितिन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे, तर प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी चाय पे चर्चा करत, खेळीमेळीत युती तोडल्याचं उदाहरणंही यावेळी नितिन गडकरी यांनी दिलं.


मात्र यानंतर २०१४ साली भाजपने शिवसेनेशी युती तोडली होती, निवडणूक अगदी तोंडावर असताना भाजपने ही युती तोडली होती.