केरळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार... भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला!
केरळमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराची घटना घडलीय. भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर अज्ञातांकडून सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला केला.
कन्नूर : केरळमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराची घटना घडलीय. भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर अज्ञातांकडून सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे कन्नूर मंडळाचे 48 वर्षीय उपाध्यक्ष सुशील कुमार यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात सुशील कुमार गंभीर जखमी झालेत. त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
तीन हल्लेखोर बाईकवरून आले होते.... त्यांची अजून ओळख पटू शकलेली नाही... पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल केली असली तरी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
भाजप नेत्यांनी मात्र या हल्ल्यामागे माकपा कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केलाय.