भाजप कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांचा हल्ला
शहरातील भाजप कार्यालयावर हल्ला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.
कोलकाता : शहरातील भाजप कार्यालयावर हल्ला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.
संतापलेल्या तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने भाजपच्या कार्यालायावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर कोलकातामध्ये तणाव आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांची रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चौकशी केल्यानंतर मंगळवारी त्यांना अटक केली. याच प्रकरणात तृणमूल काँग्रेसचेच खासदार तपस पाल यांनाही अटक करण्यात आली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. यानंतर तृणमूलच्या कार्यकर्ते आक्रमक झालेत.
अटक करण्यापूर्वी बंडोपाध्याय यांनी सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी पत्रकारांशी बोलताना दाखवली होती. माझ्याविरोधात राजकीय कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला होता.