बडोदा :  गुजरातच्या बडोद्यात बल्ड बँकांच्या निष्काळजीपणाचा एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लड बँकांच्या निष्काळजीपणामुळे १५ रुग्णांना HIV पॉझिटिव्ह, हिपेटायटीस-बी आणि हिपेटायटीस-सी इन्फेक्टेड ब्लड देण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात  अन्न आणि औषध प्रशासनाने इंदू व्हॉलेंटरी ब्लड बँक आणि सुरक्तम ब्लड बँकांना उत्तर मागितले आहे. या पीडितांमध्ये  ७ महिला आणि ८ पुरूषांचा समावेश आहे. 


ब्लड बँकचे ट्रस्टी डॉ. विजय शाह यांनी सांगितले की, मशीनच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे.  या घटनेनंतर गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने नोटीस जारी केली असून त्यानुसार ब्लड बँकेवर ब्लड देणे आणि घेण्यावर बंदी घातली आहे. 


इंदू ब्लड बँकेचे ट्रस्टी डॉ. विजय शाह भाजपचे माजी आमदार आहेत. यापूर्वी ब्लड बँकेच्या चुकीने १२ थेलेसेमिया मुलांना HIV पॉझिटिव्ह रक्त देण्यात आले होते. यात ६ मुलांचा मृत्यू झाला होता.