नवी दिल्ली : होळी खेळताना आपल्यातील अनेक जणांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पाणी भरुन त्या इतरांना फेकून मारण्याची सवय असते. ही सवय दिल्लीतील एका मुलाच्या जीवावर बेतली आहे. त्याचं झालं असं की हा १३ वर्षांचा मुलगा त्याच्या बहिणीसोबत घराच्या गॅलरीत उभा राहून पादचाऱ्यांवर फुगे फेकत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हे करताना तो गॅलरीच्या ग्रिलवर चढला. फुगा फेकण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो त्याच्या गॅलरीतून खाली पडला. या मुलाच्या डोक्याला आणि पाठीला जोरदार मार लागला आहे. सध्या हा मुलगा हॉस्पिटलात उपचार घेत आहे. 


त्याच्या समोरच्या घरात राहणारा एक माणूस या मुलाचे त्याच्या मोबाईलवर शूटिंग करत होता. त्याच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.