८ हजारांच्या शर्यतीसाठी महिलेला पतीसमोर केले रस्त्यावर विवस्त्र
पतीसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला रोड रोमिओंनी भरचौकात विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगराओंच्या कमल चौकात ही घटना घडली.
लुधियाना : पतीसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला रोड रोमिओंनी भरचौकात विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगराओंच्या कमल चौकात ही घटना घडली.
दहा रोड रोमिओंनी आपापसात आठ हजार रुपयांची शर्यत लावून महिलेचे कपडे उतरवले. तिला पतीसमोर विवस्त्र केले.
एवढा निर्लज्जपणा करून ते थांबले नाहीत तर नंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवत शिट्या मारल्या. पीडिता आणि तिच्या पतीने विरोध केला असता भामट्यांनी तेथून पळ काढला.
महिलेच्या पतीने त्याच्या मित्रांना बोलवून रोड रोमिओंचा पाठलाग केला. एका पकडले. त्याची चांगली धुलाई करून पोलिसांच्या हवाली दिले.
बदनामी होईल, या भीतीने पीडित महिलेने पोलिसांत कोणतीही तक्रार केली नाही. आरोपींनी पुन्हा पीडितेला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र, तिने पोलिसांना आपबिती सांगितली.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची दखल घेऊन एका आरोपीला अटक केले आहे.
पोलिसांनी सुरु केला चौकशी...
एसएचओ राजेश शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपी रवी कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
चुकीला माफी नाही- एसएसपी
एसएसपी उपिन्द्रजीत सिंह घुम्मन यांनी सांगितले की, चुकीला माफी नाही. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
- स्थानिक भाजप नेत्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.