लखनौ : बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदी झाल्यानंतर नोटा फेकून द्यायच्या का, नियमानुसारच आम्ही सर्व केलं आहे, असं भाजपा नेते मायावती यांनी म्हटलं आहे.


भाजपाच्या इशाऱ्यावर ही कारवाई होत आहे, तसेच भाजप आणि इतर पक्षांनीही मोठ्या प्रमाणात बँकेत पैसा जमा केला असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे.


बसपाने नोटबंदीच्या काळात बँकेत 104 कोटी रूपये जमा केले आहेत, यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मायावतींनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.