बस वाहून गेली पण, गावकऱ्यांनी अखेर....
कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात नदीला अचानक आलेल्या पुरामुळं बस वाहून गेली. या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते.
गदग : कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात नदीला अचानक आलेल्या पुरामुळं बस वाहून गेली. या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळं अनेकांचा जीव धोक्यात आला होता.
मात्र जवळच्या गावकऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवत, या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोराच्या साहाय्यानं नदीच्या किना-यावर आणलं. ही दृश्य अतिशय चित्तथरारक आहेत. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतात अनेक ठिकाणी पावसाळ्यात बस किंवा वाहनं वाहून जाण्याच्या घटना घडतात, मात्र ही कर्नाटकातील ही घटना चक्क उन्हाळ्यात घडली.