हैदराबाद : तेलंगणात बस कालव्यात कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी आहेत. ही घटना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात घडली. ही बस नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 खम्मम-हैदराबाद महामार्गावरून ही बस हैदराबादहून काकीनाडा येथे जात असताना कालव्यात कोसळली. नयाकुंगेडमजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली. 


या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जणांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.  बसमधील १८ प्रवासी जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.