नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. नोटाबंदीनंतरच्या गोंधळावर यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडीच लाखांच्यावर रक्कम बँकेत भरल्यास आणि त्याच्या उत्पन्नाचे पुरावे न दिल्यास 200 टक्क्यांपर्यंत दंड होईल, असं आयकर खात्यानं जाहीर केलंय. या दंडाच्या भीतीनं अनेक जण आपल्याकडच्या 500 आणि हजारच्या नोटा अद्याप बँकेत घेऊन आलेले नाहीत. त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये या दंडाबाबत फेरविचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


याखेरीज जुन्या नोटांसाठी सरकार एखादी ठेव योजना किंवा बॉण्ड्सही आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण 500 आणि हजाराच्या चलनात असलेल्या सर्व नोटा परत याव्यात अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे त्या जाळण्याऐवजी किंवा फेकून देण्याऐवजी एखादी चांगली स्कीम आणून अन्य मार्गानं या नोटा सरकारजमा करता येतील काय, याची चाचपणी केली जात आहे. याखेरीज नोटाबंदीनंतर उडालेल्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी अन्य काही महत्त्वाचे निर्णय़ या बैठकीत घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.