जयपूर : व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून हॉटेलमध्ये कॉलगर्ल पुरवल्या जात असल्याचं प्रकरण उघड झालं आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि चौकशीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे झाले. कॉलगर्लचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून त्यानंतर त्यांचा रेट ठरायचा आणि त्यानतंर त्यांना मुंबईहून बोलवलं जात होतं. पोलिसांनी मुंबईच्या दोन मुली, दोन महिला आणि दोन दलालांना अटक केला आहे.


कस्टमरकडून या दलालांना २ हजार रुपये मिळत होते तर कॉल गर्लला एका दिवसासाठी १० हजार रुपये द्यायचे. मुंबईहून राजसमंद येथे मुलींना ६ दिवसांसाठी बोलवण्यात आलं होतं यासाठी त्यांना ६० हजार रुपये देण्याचे ठरले होते. डीएसपी माधुरी आणि विशेष शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.