मुंबई : ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांकडून दंड स्विकारू शकतात का? ट्रॅफिक पोलीस चलन फाडू शकतात का? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. व्हॉट्स अॅपवरही अशाप्रकारचे अनेक मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रॅफिक हवालदार तुमची गाडी थांबवून तुमच्याकडे गाडीची कागदपत्र मागू शकत नाहीत. हे अधिकार फक्त SI आणि त्यावरच्या अधिकाऱ्यांना आहेत. ट्रॅफिक हवालदाराकडे तुमची गाडी जप्त करण्याचे आणि तुम्हाला अटक करण्याचे अधिकारही नाहीयेत. 


काही अपवादात्मक गोष्टी म्हणजेच जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल, तुमच्या गाडीत ड्रग्स असतील, ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सामान असेल, मोबाईलवर बोलताना तुम्ही गाडी चालवत असाल, तुम्ही वेगमर्यादा ओलांडली तरच ट्रॅफिक पोलीस तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करू शकतात. 


हेड कॉन्स्टेबल फक्त 100 रुपयांपर्यंतचच चलन फाडू शकतो. कॉन्स्टेबलला हे अधिकारही देण्यात आलेले नाहीत. ASI आणि SI हे दोघंच तुमच्याकडून 100 रुपयांपेक्षा जास्त रकमेचं चलन फाडू शकतात.