तुम्हाला, `एटीएम`मध्ये खणखणाट दिसतोय, कारण...
नोटाबंदीनंतर देशातील जनतेला पुन्हा एकदा नोटांच्या चणचणीला सामोरं जावं लागू शकतं.
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशातील जनतेला पुन्हा एकदा नोटांच्या चणचणीला सामोरं जावं लागू शकतं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नोटांचा सप्लाय कमी केलाय. त्यामुळेच देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधीलही एटीएम एक तर रिकामे आहेत किंवा त्यांचे शटर डाऊन दिसत आहेत.
'इकोनॉमिक टाईम्स'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयनं बँकांसाठी कॅश फ्लो २५ टक्के कमी केलाय. एका योजनेंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. डिजिटल ट्रान्झक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी कॅश सप्लाय कमी करण्यात आलंय.
मार्केटमध्ये नोटाबंदीनंतर वाढलेली लिक्विडिटी प्रमाणात आणण्यास यामुळे मदत होईल आणि महागाई नियंत्रणात ठेवता येणं शक्य होईल, असा आरबीआयचा या निर्णयामागचा हेतू आहे.
परंतु, आरबीआयच्या या निर्णयामुळे लोकांच्या अडचणी मात्र वाढल्यात. एटीएम रिकामी असल्यानं गरजुंना माघारी फिरावं लागतंय... पण, या काळात तुम्ही नक्कीच डिजीटल ट्रान्झक्शनला प्राधान्य देऊ शकता.