मुंबई : किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयनं काल 11 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून ही कारवाई केली. यात आयडीबीआय बँकेचा तत्कालीन चेअरमन योगेश अग्रवाल, माजी उपसंचालक बी.के बत्रा, ओ.व्ही. बुंदेलू, तत्कालीन कार्यकारी संचालक एस.के.व्ही. श्रीनिवासन अशा बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 


याशिवाय बंद पडलेल्या किंशफिशर एअरलाईनचा सीएफओ ए रघुनाथन, एव्हीपी शैलेश बोरकर, डीजीएम अमित नाडकर्णी आणि वरिष्ठ व्यवस्थपाक ए सी शाह यांनाही गजाआड करण्यात आलंय. 


2012-13 मध्ये आयडीबीआय बँकेनं केवळ 'किंगफिशर' या ब्रँडनेमच्या तारणावर मल्ल्यांच्या कंपनीला 900 कोटींचं कर्ज दिल्याचं उघड झालंय.