सीबीआय छाप्यांवर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली
माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या मालमत्तांवरील छापेमारीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे.
नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या मालमत्तांवरील छापेमारीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे.
काँग्रेस किती भ्रष्टाचारी आहे हे आता देशाला समजेल असं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय. तर सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
सीबीआयचा गैरवापर होत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेत असतानाही सीबीआयचा काँग्रेस गैरवापर करत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांच्या घरीही, एकूण २२ ठिकाणी सीबीआयने सकाळी साडेआठच्या सुमारास धाडी टाकल्या आहेत.