नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सीबीआयने आप सरकारच्या सोशल मीडिया अभियान टॉक टू एकेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सिसोदिया आणि इतरांची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली सरकारने टॉक टू एकेसाठी आजी - माजी जनसंपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती आणि याच्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्याच आली होती. या सगळ्या नियुक्तीत मुख्य सचिवांच्या आक्षेपानंतरही प्रस्ताव संमत करुन निधीही खर्च करण्यात आला आहे.


सीबीआयच्या चौकशीत सिसोदियासह अन्य आरोपींची चौकशी होणार आहे. दरम्यान, या सगळ्याचा सिसोदियांनी ट्विटवरुन समाचार घेतला आहे. त्यांनी थेट मोंदीनाच मैदानात या, माझ्या घरात आणि ऑफीसात सीबीआयचे स्वागत आहे, असा टोला हाणला आहे.  


यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानीही ट्विट करत मोदींवर निशाणा साधलाय. गोवा आणि पंजाबमध्ये पराभव दिसल्यामुळेच सीबीआयला पुढे करुन कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी लावला आहे.