कोलकाता : नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करणाऱ्या अनेक बँक कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. दररोज देशभरातून विविध ठिकाणांहून पैसे जप्त केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅक्सिस बँकनंतर आता यूनियन बँक ऑफ इंडिया अडचणीत सापडली आहे. बनावट अकाउंट्स आणि बँक अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत काळापैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला आहे. CBI ने कोलकाताच्या UBI बँकेच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. बँक मॅनेजरची देखील याप्रकरणात चौकशी सुरु आहे.


CBI ला UBI मध्ये ९ संशयास्पद अकाउंट्स मिळाले आहेत. या सगळ्या अकाउंट्समध्ये 6.6 कोटी रुपये जमा केले गेले आहेत. हे प्रकरण आता इडीकडे सोपवण्यात आलं आहे. 


काही दिवसांपूर्वी अॅक्सिस बँकमध्ये नोटबंदीनंतर काही बनावट अकाऊंट्स समोर आले होते. यानंतर बँकेच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या. बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या या गुन्ह्यामुळे बँकेचे एमडी आणि सीईओ शिखा शर्मा यांनी देशाची माफी देखील मागितली होती.