नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता कमीतकमी ९००० रुपये पेंशन मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या नव्या शिफारशींनुसार सध्याच्या पेंशनमध्ये 157.14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार कार्मिक आणि पेंशन मंत्रालयाने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या या शिफारशींना स्विकार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रॅच्युटीची सीमा वाढवून आता 10 लाखाहून 20 लाख करण्यात आली आहे.


आयोगाने अशी ही शिफारिश केली आहे की ग्रॅच्युटी 25 टक्यांनी वाढवली जाणार आहे ज्यामुळे डियरनेस अलाउंस (डीए) 50 टक्के वाढणार आहे. हा प्रस्ताव देखील सरकारने मंजूर केला आहे.


केंद्र सरकारचे जवळपास 58 लाख पेंशनर्स आहे. अशा प्रकारे कमीतकमी पेंशन 9,000 रुपये आणि सर्वोच्च पेंशन 1 लाख 25 हजार रुपये होणार आहे. जी सरकारच्या सर्वाधिक वेतनाच्या 50 टक्के आहे.