नवी दिल्ली : केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या कामाच्या शैलीवर नाराज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महबूबा मुफ्ती जवानांचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात त्या प्रभावीपणे काम करत नसल्यानेही केंद्र सरकार नाराज आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या वापर ज्याप्रकारे जवानांच्या विरोधात होत आहे ते धोकादायक आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे गृह मंत्रालय यामध्ये काहीतरी ठोस कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय. पंतप्रधान मोदी दिल्लीत परतल्यानंतर यावर चर्चा होणार आहे.