कानपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेसहारा पशूंच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यामध्ये त्यांच्या हत्येवर देखील बंदी घातली जाऊ शकेल. राज्यातील अनेक अवैध कत्तलखाने देखील त्यांनी बंद केले. पण एकाने त्यांच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेरापूरमध्ये नसीम याने एका पशुची हत्या केली. याबाबत पोलिसांना माहिती होताच त्याच्या घरावर छापा मारत पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, मुंगीसापूरमध्ये नसीम हा काही लोकांसोबत एका घरात पशूंना मारुन मांसची विक्री करत आहे.


पोलिसांनी त्या ठिकाणी ८० किलो मांस जप्त केलं. सोबतच काही औजारे, देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. हे मांस परीक्षणासाठी पाठवण्यात आलं आहे. त्याचे काही सहकारी मात्र फरार झाले आहेत.