चंदीगड स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला चांगले यश, काँग्रेसला धक्का
पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या चंदीगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे.
चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या चंदीगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे.
चंदीगड पालिका निवडणुकीत 26 पैकी 24 जागांचे निकाल जाहीर झालेत. त्यापैकी 19 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. अकाली दलाला 1 आणि काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर उत्तर भारतात झालेल्या या निवडणुकीत भाजपनं मोठा विजय साजरा केलाय. येत्या काळात पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी मिळालेल्या या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.