नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची अखेर सुटका झालीय. वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चंदू चव्हाण यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी 29 सप्टेंबर रोजी बॉर्डरवर गस्त घालत असताना भारतीय जवान चंदू चव्हाण चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर चव्हाण यांना पाकिस्तानी ताब्यात आपल्या ताब्यात ठेवले होते. जम्मू काश्मीरच्या मेंढरमध्ये 37 राष्ट्रीय रायफल्सच्या चौकीवर 22 वर्षीय चंदू चव्हाण तैनात होते. आज त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर चंदू चव्हाण मायदेशी परतलेत. वाघा बॉर्डरवर भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं.


हृदयद्रावक घटना म्हणजे, चंदू यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याची बातमी समजल्यानंतर धुळ्यात राहणाऱ्या त्यांच्या आजीचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं होतं. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सतत पाकिस्तानच्या संपर्कात होतं.